ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात एक धाव घेताच ऋषभ पंतनं कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या आहेत. एक हजार धावा करताच पंतनं कसोटीत सर्वात वेगवान धावा करण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. ऋषभ पंतनं २७ व्या डावांत १००० धावा करण्याचा पराक्रम केला आहे.
कसोटी सामन्यात सर्वाधिक वेगवान एक हजार धावा करणाऱ्या यष्टीरक्षकाचा विक्रम माजी कर्णधार धोनीच्या नावावर होता. धोनीनं ३२ डावांत कसोटीमध्ये १००० धावा केल्या. धोनीनं माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुख इंजिनिअरनं ३६ डावांत एक हजार धावा केल्या आहेत. वृद्धीमान साहानं ३७ डावांत एक हजार धावांचा टप्पा पार केला होता.
आणखी वाचा- शुबमन गिलचा धमाका! मोडला सुनील गावसकरांचा ५० वर्ष जुना विक्रम
आपल्या कसोटी कारकिर्दीत ऋषभ पंतनं २७ व्या डावांत एक हजार धावा केल्या आहेत. यादरम्यान त्यानं दोन शतकं आणि एक अर्धशतक झळकावलं आहे. बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनी कसोटी सामन्यात त्यानं ९७ धावांची खेळी केली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 19, 2021 10:25 am