मुंबईचा क्रिकेटपटू आणि भारतीय संघात हिटमॅन नावाने ओळखला जाणाऱ्या रोहित शर्मावर आगामी आफ्रिका दौऱ्यात बीसीसीआयने आणखी एक जबाबदारी टाकली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ दिवसीय अध्यक्षीय संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. कसोटी मालिकेआधी, २६-२८ सप्टेंबरदरम्यान हा सराव सामना खेळवला जाणार आहे.

गुरुवारी बीसीसीआयच्या निवड समितीने आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. यामध्ये खराब फॉर्मात असलेल्या लोकेश राहुलला डच्चू देऊन शुभमन गिलला संघात संधी देण्यात आली आहे. याचसोबत रोहित शर्मालाही अपेक्षेप्रमाणे सलामीवीराच्या जागेवर बढती मिळाली आहे. २ ऑक्टोबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs SA : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, लोकेश राहुलला डच्चू

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सराव सामन्यासाठी असा आहे अध्यक्षीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, सिद्धेश लाड, के.एस.भारत (यष्टीरक्षक), जलज सक्सेना, धर्मेंद्रसिंह जाडेजा, आवेश खान, इशान पोरेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव

अवश्य वाचा – Ind vs SA : कसोटी मालिकेत रोहित शर्माला सलामीला संधी