दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी एम.एस.के. प्रसाद यांच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. अपेक्षेप्रमाणे गेल्या काही मालिकांमध्ये खराब कामगिरी करणाऱ्या लोकेश राहुलला आफ्रिकेविरुद्ध मालिकेत डच्चू देण्यात आला आहे. राहुलच्या जागी भारत अ संघाकडून विंडीज आणि आफ्रिकेविरुद्ध चांगली कामगिरी करणाऱ्या शुभमन गिलला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या रोहित शर्मालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. राहुलच्या जागी रोहितचा सलामीवीर म्हणून विचार केला जाऊ शकतो असं वक्तव्य प्रसाद यांनी केलं होतं. त्यामुळे आफ्रिकेविरुद्ध मालिकेत रोहितला सलामीवीर म्हणून संधी मिळते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा असेल भारताचा संघ –

विराट कोहली (कर्णधार), मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि शुभमन गिल

Story img Loader