News Flash

रोनाल्डो, सांतोस यांना ग्लोब पुरस्कार

रोनाल्डोने यंदा प्रतिष्ठेचे युरोपियन अजिंक्यपद देशाला प्रथमच जिंकून देण्याची किमया साधली.

रोनाल्डो या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकला नसला तरी त्याने दृकश्राव्य माध्यमातून चाहत्यांनी संवाद साधताना.  

 

रिअल माद्रिदचा अव्वल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि युरो अजिंक्यपद जिंकून देणारे पोर्तुगालचे प्रशिक्षक फर्नाडो सांतोसला दुबईत झालेल्या एका शानदार कार्यक्रमात ग्लोब फुटबॉल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

रोनाल्डोने यंदा प्रतिष्ठेचे युरोपियन अजिंक्यपद देशाला प्रथमच जिंकून देण्याची किमया साधली. याचप्रमाणे रिअल माद्रिदला विक्रमी ११वे युरोपियन विजेतेपद जिंकून दिले.

‘‘हे वर्ष कदाचित माझ्या कारकीर्दीतील सर्वोत्तम असे आहे. काही जण मी रिअल माद्रिदचा की देशाचा अशा शंका उपस्थित करतात. मात्र मी दोन्ही जेतेपदांना गवसणी घातली आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद होत आहे,’’ असे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिलेल्या रोनाल्डोने व्हिडीओद्वारे सांगितले. याच महिन्यात रोनाल्डोने प्रतिष्ठेचा बॅलॉन डी’ओर पुरस्कार चौथ्यांदा जिंकण्याची किमया साधली होती. फ्रान्समध्ये झालेल्या युरोपियन स्पध्रेत ६२ वर्षीय सांतोसने पोर्तुगालच्या विजयाचा अध्याय लिहिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 12:57 am

Web Title: ronaldo santos get globe award
Next Stories
1 आयओएची मान्यता काढून घेण्याचा गोयल यांचा इशारा
2 नरसिंग प्रकरणाचा निकाल एप्रिलमध्ये अपेक्षित
3 अझर अलीच्या द्विशतकाला डेव्हिड वॉर्नरचे शतकी प्रत्युत्तर
Just Now!
X