News Flash

T20 World Cup : टीम इंडियाला फायनलसाठी सचिनच्या शुभेच्छा, म्हणाला…

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी अंतिम सामना

Women’s T20 World Cup 2020 Ind vs Eng : टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही. त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने ४ सामने जिंकत ८ गुण मिळवले होते. तर इंग्लंडने ३ सामने जिंकून ६ गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.

T20 World Cup : भारत-इंग्लंड सामन्याच्या निकालावर सेहवागचं हटके ट्विट, म्हणाला…

“मैदानात जा आणि सर्वोत्तम कामगिरी करा. आणि माझा महिला संघातील खेळाडूंना महत्त्वाचा संदेश म्हणजे अंतिम फेरीचे दडपण घेऊ नका. (असं संदेश देणं) जरी सोपं असलं तरी शांत राहा आणि दमदार कामगिरी करा. संघ म्हणून एकत्र येऊन खेळा. संघातील खेळाडूंकडून सकारात्मक गोष्टी घ्या. मी महिला संघाचे सामने सतत पाहत आहे. हे खेळाडू अनेक तरूण-तरूणींचे प्रेरणास्रोत आहेत. त्यामुळे मैदानात जाऊन जोरदार कामगिरी करा.”, असा संदेश मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने महिला क्रिकेट संघाला दिला.

T20 World Cup : ‘सामना खेळू न देताच वर्ल्ड कपमधून बाहेर कसं काढता?’

भारतीय संघाने महिला टी २० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम रचला. या आधी २०१८ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडनेच पराभूत केले होते. त्यानंतर अनुभवी फलंदाज मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यात वाद चर्चेचा विषय ठरला होता. पण यंदाच्या स्पर्धेत मात्र सामना न खेळताच भारताला अंतिम फेरीचं तिकीट मिळालं.

Video : …म्हणून साडी नेसून क्रिकेटच्या मैदानात उतरली मिताली राज

भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना रंगणार म्हणून मोठ्या संख्येने चाहतावर्ग सामन्यासाठी उपस्थित होता. भारताने साखळी फेरीत आपले सर्व सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीचे तिकीट पटकावणारा भारत स्पर्धेतील पहिला संघ ठरला होता. याऊलट इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने उपांत्य फेरीत धडक मारली. तशातच यंदाच्या स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघ अजिंक्य होता, पण इंग्लंडने २००९, २०१२, २०१४ आणि २०१६ तसेच २०१८च्या विश्वचषकात भारताला हरवले होते. त्यामुळे उपांत्य फेरीत कोणता संघ वरचढ ठरतो? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. पण अखेर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि इंग्लंडच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2020 11:12 am

Web Title: sachin tendulkar wishing good luck to team india women t20 world cup vjb 91
Next Stories
1 “पंतला संघात घेण्याची बुद्धी कोणाला झाली होती?”
2 ICC Women’s T20 World Cup 2020 : हरमनप्रीतसाठी दुहेरी पर्वणी
3 ‘आयपीएल’ला करोनाचा फटका?
Just Now!
X