04 July 2020

News Flash

‘डेन्मार्क ओपन’साठी सायना सज्ज

भारतीय बॅडमिंटन लीगचे विजेतेपद पटकाविल्यानंतर जवळपास अर्धा महिन्याच्या विश्रांतीनंतर भारताची फुलराणी सायना नेहवाल

| October 14, 2013 04:23 am

भारतीय बॅडमिंटन लीगचे विजेतेपद पटकाविल्यानंतर जवळपास अर्धा महिन्याच्या विश्रांतीनंतर भारताची फुलराणी सायना नेहवाल आता डेन्मार्कमध्ये होणाऱया डेन्मार्क सुपर सरिजसाठी सज्ज झाली आहे. या स्पर्धेतही विजय प्राप्त करून आपली विजयी मालिका सुरू ठेवण्याचा तिचा प्रयत्न असेल.
सायना म्हणाली, मी आधीच्या डेन्मार्क ओपनची विजेती आहे. जरा कठीण आहे परंतु, विजेतेपद कायम राखण्यासाठी मी सज्ज आहे. आयबीएल स्पर्धेतही माझी कामगिरी चांगली झाली. यावेळेसही मी शंभर टक्के प्रयत्न करेन आणि विजतेपद कायम राखेन अशी आशा आहे. तसेच आय़बीएल स्पर्धेनंतर जरा विश्रांतीची गरज होती आणि दीड-महिन्यांच्या विश्रांतीनंतर नव्या जोमाने खेळण्यास मी उत्सुक आहे असेही सायना म्हणाली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2013 4:23 am

Web Title: saina looking for first 2013 title in denmark open
टॅग Saina Nehwal
Next Stories
1 सचिनसोबत ‘१०’ नंबर जर्सीही निवृत्त!
2 भारताची आज विजयादशमी?
3 मुंडेंचा अर्ज अवैध, पवारांचा मार्ग मोकळा
Just Now!
X