25 February 2021

News Flash

विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबईच्या संघनिवडीसाठी अंकोला यांचे साकडे

मुश्ताक अली क्रिकेट स्पध्रेत सलग चार सामन्यांत पराभूत झाल्यामुळे मुंबईचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

| January 25, 2021 12:40 am

सलिल अंकोला

मुंबई : सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेप्रमाणे मुंबईची कामगिरी खराब होऊ नये, याकरिता विजय हजारे करंडक स्पध्रेसाठी संभाव्य संघाची निवड लवकर करण्याची मुभा द्यावी, अशी विनंती निवड समितीचे प्रमुख सलिल अंकोला यांनी मुंबई क्रिकेट संघटनेकडे (एमसीए) केली आहे.

मुश्ताक अली क्रिकेट स्पध्रेत सलग चार सामन्यांत पराभूत झाल्यामुळे मुंबईचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मुंबईला एकमेव सामन्यात विजय मिळवता आला. ‘‘मुंबईचे प्रशिक्षक अमित पागनीस यांनी २० जानेवारीलाच पदाचा राजीनामा सादर केला आहे. हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या तारखा निश्चित झाल्या नसल्या तरी फेब्रुवारीच्या मध्यावर स्पध्रेला प्रारंभ होईल, असा अंदाज भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वर्तवला आहे. त्यामुळेच संभाव्य संघाची निवड करण्यासाठी मी परवानगी मागितली आहे,’’ असे अंकोलाने सांगितले.

येत्या आठवडय़ात ‘एमसीए’च्या कार्यकारी परिषदेची बैठक होणार असून, यात याबाबत चर्चा होईल, अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 25, 2021 12:40 am

Web Title: salil ankola seeks mca permission to select vizay hazare probables at earliest zws 70
Next Stories
1 कसोटी सलामीवीर झाल्यास स्वप्नपूर्ती!
2 करोनानंतर नव्या जोमाने सुरुवात आवश्यक!
3 चिली हॉकी दौरा :  भारतीय महिला हॉकी संघाचा चिलीवर विजय
Just Now!
X