23 September 2020

News Flash

पाकिस्तानी संघाने विचारलं शोएब मलिकचं एका शब्दात वर्णन करा, सानिया मिर्झा म्हणते…

करोनामुळे PSL चे सामने स्थगित

करोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या पाकिस्तान सुपर लिग स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने अनिश्चीत काळासाठी पुढे ढकलले आहेत. पाकिस्तानचा क्रिकेटपटू आणि भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक हा पेशावर झमली या संघाकडून खेळतो. पेशावर झलमी संघाने शोएब मलिकचा फोटो पोस्ट करत, चाहत्यांना एका शब्दांत वर्णन करायला सांगितलं.

यावर अनेक चाहत्यांनी आपापल्या पद्धतीने प्रतिक्रीया दिली. सानिया मिर्झाने यावेळी योग्य संधी साधत, शोएबच्या फोटोवर हँडसम अशी कमेंट केली आहे.

करोनामुळे पाकिस्तानमध्येही सध्या चिंतेचं वातावरण आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी, बहुतांश जनता रोजंदारीवर जगत असल्यामुळे लॉक डाऊन करणं शक्य नसल्याचं म्हटलंय. क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीनेही आपल्या नजिकच्या परिसरातील लोकांना मोफत अन्नधान्य देत आपलं सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2020 9:28 pm

Web Title: sania mirza responds as peshawar zalmi ask fans to describe shoaib malik in one word psd 91
Next Stories
1 2003 WC Final : पाँटींगने पोस्ट केला बॅटचा फोटो, भारतीयांनी विचारलं, यात स्प्रिंग होती ना??
2 CoronaVirus : खेळाडूसह सर्व कर्मचाऱ्यांना आरोग्य विम्याचं संरक्षण, बंगाल क्रिकेट असोसिएशनचा निर्णय
3 CoronaVirus : परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय IPL रद्द करण्याच्या तयारीत??
Just Now!
X