24 February 2021

News Flash

सानिया-बेथनी यांची अंतिम फेरीत धडक

सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकेची सहकारी बेथनी मटेक-सँड्स यांनी डब्ल्यूटीए पोर्सचे टेनिस ग्रां. प्रि. स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत या मोसमातील तिसऱ्या जेतेपदाच्या दिशेने भक्कम

| April 29, 2013 01:36 am

सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकेची सहकारी बेथनी मटेक-सँड्स यांनी डब्ल्यूटीए पोर्सचे टेनिस ग्रां. प्रि. स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारत या मोसमातील तिसऱ्या जेतेपदाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले आहे. बिगरमानांकित सानिया-बेथनी जोडीने उपांत्य फेरीत जर्मनीच्या अँजेलिक केर्बर आणि आन्द्रिया पेटकोव्हिच या जोडीचा ६-४, ७-५ असा दोन सेटमध्ये पराभव केला. एक तास आणि ३१ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सानिया-बेथनी जोडीने सहा ब्रेकपॉइंट आपल्याकडे वळवले, तर स्वत:च्या सव्‍‌र्हिसवर नऊ ब्रेकपॉइंट वाचवले. त्यांना अंतिम फेरीत जर्मनीच्या सबिन लिसिकी आणि मोना बार्थेल यांच्याशी लढत द्यावी लागेल. लिसिकी-बार्थेल जोडीने क्रोएशियाच्या दारिजा जुराक आणि कॅटलिन मारोसी जोडीचा ६-३, ६-४ असा सहज पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 1:36 am

Web Title: saniya bethani in final round 2
Next Stories
1 आयपीएल लाईव्ह: चेन्नईची कोलकातावर मात
2 युनायटेडचा बोलबाला!
3 भारताचे आव्हान संपुष्टात
Just Now!
X