पस्तिसाव्या सिनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे हरयाणा व कर्नाटक संघ अजिंक्य ठरले असून विदर्भाला पुरुष गटात तिसरे स्थान मिळाले आहे. पुरुषांच्या उपांत्य सामन्यात छत्तीसगड संघाने विदर्भाचा २५-१०, २५-१२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात हरयाणा संघाने कर्नाटक संघाला हरवले. अंतिम सामन्यात हरयाणा संघाने छत्तीसगड संघावर मात करून राष्ट्रीय चषकावर नाव कोरले. विदर्भ संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
महिला गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाने गोव्यावर २५-९, २५-५ अशी मात केली. दुसऱ्या उपांत्य सामन्यात छत्तीसगड संघाने हरयाणा संघावर मात केली. अटीतटीच्या अंतिम सामन्यात हरयाणा संघाने कर्नाटक संघाचा पराभव करून चषक मिळवला. छत्तीसगड संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला.
विदर्भ थ्रोबॉल संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ३५व्या सिनियर राष्ट्रीय थ्रोबॉल स्पर्धेत २७ राज्यांचे संघ सहभागी झाले होते. विजेत्या व उपविजेत्या संघांना अरविंद करवंदे व इतरांच्या हाताने चषक प्रदानकरण्यात आले. प्रवीण कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पारितोषिक वितरण कार्यक्रमात युवा शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख आकाश सरोदे, प्रा. रवीश जालमकर, केशव भगत, जयकुमार क्षीरसागर, मुकुंद मुसळे हजर होते. संघटनेचे सचिव जयकुमार वरघट यांनी सचिवांचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाचे संचालन रीना रविकुमार यांनी केले, तर दिनेश छपाने यांनी आभार मानले.