ग्लासगो (स्कॉटलंड) येथे पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या अ‍ॅथलेटिक्स संघातून रंजित माहेश्वरी याच्यासह सात खेळाडूंना वगळण्यात आले आहे. भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (एएफआय) हा निर्णय घेतला आहे.
भारतीय ऑलिम्पिक महासंघाने (आयओए) या स्पर्धेसाठी २२४ सदस्यांची निवड केली होती. त्यामध्ये अ‍ॅथलेटिक्सच्या ४१ खेळाडूंचा समावेश होता. माहेश्वरी याच्याबरोबरच पुरुषांच्या ४ बाय १०० मीटर रिले संघाच्या सहा खेळाडूंनाही वगळण्यात आले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिलेल्या खेळाडूंच्या यादीत हरवंत कौर हिचा समावेश आहे. २०१० मध्ये तिने राष्ट्रकुल स्पर्धेतील थाळीफेकमध्ये रौप्यपदक मिळविले होते. तिने जून २०१२ मध्ये आंतरराज्य स्पर्धेत भाग घेतला होता. मात्र त्यानंतर गेली दोन वर्षे तिने कोणत्याही स्पर्धेत भाग घेतलेला नाही. अ‍ॅथलेटिक्सच्या ३३ खेळाडूंच्या यादीत तिचा समावेश केलेला नाही. मात्र लिंगनिदान चाचणी करण्यात आलेल्या दुती चंद हिला या यादीत स्थान मिळाले आहे.
या संदर्भात भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे सचिव सी.के.वॉल्सन यांनी सांगितले, रिले संघातील खेळाडूंच्या दुखापतीमुळे व सराव शिबिरातील खराब कामगिरीमुळे हा संघ पाठविला जाणार नाही. आम्ही आयओएला चारपाच महिन्यांपूर्वी संभाव्य खेळाडूंची यादी पाठविली होती. त्यामध्ये तिच्या नावाचा समावेश असावा. त्यामध्ये हरवंतचे नाव होते मात्र आता तिला वगळण्यात आले आहे.
दुती चंद हिला एएफआयच्या आदेशानुसार लिंगनिदान चाचणीस सामोरे जावे लागले होते. तिच्या चाचणी संदर्भात कोणतेही भाष्य करण्यास वॉल्सन यांनी नकार दिला.
भारतीय अ‍ॅथलेटिक्स संघ-पुरुष-४ बाय ४०० मीटर रिले-राजीव आरोकिया, कुन्हु मोहंमद, सचिन रुबी, ललित माथूर, जितू बेबी, जिबिन सेबॅस्टियन. ११० मी.हर्डल्स-सिद्धांत थिंगलिया, तिहेरी उडी-अर्पिदरसिंग, गोळाफेक-ओमप्रकाश क ऱ्हाना. थाळीफेक-विकास गौडा, भालाफेक-रवींदरसिंग खायरा, देविंदरसिंग, विपिन कसाना. हातोडाफेक-कमलप्रीतसिंग, चंद्रोदय नारायणसिंग. महिला-४ बाय १०० मी.रिले-शारदा नारायण, एच.एम.ज्योती, सर्बानी नंदा, आशा रॉय, संथिनी वल्लिक्कड, मेर्लिन जोसेफ, दुती चंद. ४ बाय ४०० मी.रिले-एम.आर.पूवम्मा, टिंटू लुका, देवश्री मजुमदार, रतनदीप कौर, अनिल्डा थॉमस, अश्विनी आकुनजी. उंच उडी-सहानाकुमारी, लांब उडी-मायुखा जॉनी, थाळीफेक-सीमा पुनिया, कृष्णा पूनिया, भालाफेक-अन्नु राणी.

Sunil Narine Denied to Play T20 WC 2024 From west Indies
आयपीएलमध्ये शतक आणि हॅट्ट्रिक नावावर असणाऱ्या खेळाडूचा ट्वेन्टी२० वर्ल्डकप खेळण्यास नकार
rishbh pant
Ipl 2024, LSG vs DC: दिल्लीला कामगिरीत सुधारणेची आशा! आज लखनऊ सुपर जायंट्सचे आव्हान; राहुल, पंतकडे लक्ष
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Indian Premier League GT vs LSG today match ipl 2024
मयांक यादवकडे लक्ष! लखनऊ सुपर जायंट्सची गाठ आज गुजरात टायटन्सशी