05 March 2021

News Flash

शेन वॉटसनची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर वॉटसनने आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनने रविवारी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या संकेतस्थळावर वॉटसनने आपला निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.

नुकत्याच झालेल्या अ‍ॅशेस मालिकेतील कार्डिफची सलामीची कसोटी ही ३४ वर्षीय वॉटसनच्या १० वर्षांच्या कसोटी कारकीर्दीतील अखेरची कसोटी ठरली. ती कसोटी इंग्लंडने १६९ धावांनी जिंकली. या सामन्यात वॉटसनने अनुक्रमे ३० आणि १९ धावा केल्या. तर गोलंदाजीतही तो प्रभाव पाडू शकला नाही. त्यामुळे उर्वरित मालिकेसाठी त्याने कसोटी संघातील स्थान गमावले.
‘‘माझ्यासाठी, माझ्या कुटुंबीयांसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघासाठी काय योग्य आहे, याचा विचार मी केला. माझ्याकडून मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला आहे. मात्र गेले काही दिवस मी निवृत्तीच्या निर्णयावर ठाम झालो,’’ असे वॉटसनने सांगितले.
वॉटसनने एक कसोटी आणि नऊ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यांत ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवले आहे. लॉर्ड्सवरील इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने शानदार विजय मिळवला. या सामन्यात वॉटसनला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मालिकेतील उर्वरित सामन्यांना त्याला मुकावे लागणार आहे. त्यानंतर वॉटसनने कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला.
वॉटसनचा २०१३-१४च्या अ‍ॅशेस विजेत्या ऑस्ट्रेलिया संघात समावेश होता. याप्रमाणे यंदा जगज्जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या ऑसी संघातही तो सामील होता. २०१३मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघातील पाच खेळाडूंना संघ व्यवस्थापनाचे निर्णय डावलल्याप्रकरणी वगळण्यात आले होते. यात वॉटसनचाही समावेश होता. रविवारी सकाळी त्याने संघसहकाऱ्यांना आपला निर्णय कळवला. काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधील अ‍ॅशेस मालिकेत हार पत्करल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार मायकेल क्लार्कने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

गेला महिनाभर विचार करून हा निर्णय मी घेतला आहे. कसोटी क्रिकेटला अलविदा करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे मला वाटते. मात्र एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये मी आणखी काही काळ खेळू शकेन, अशी मला आशा आहे.
-शेन वॉटसन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 3:05 am

Web Title: shane watson retires from tests with immediate effect
Next Stories
1 बीसीसीआयची मनधरणी करणे थांबवा – मियाँदाद
2 युवा बॉक्सिंगपटूंनी आशा उंचावल्या! , आठवडय़ाची मुलाखत ‘जय कवळी’
3 उत्तर आर्यलडची आगेकूच कायम आणखी एक सामना जिंकावा लागणार
Just Now!
X