News Flash

IND vs AUS: शार्दुलची अष्टपैलू कामगिरी; कपिल देव, इरफान पठाण यांच्या पंगतीत स्थान

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर केला खास पराक्रम

शार्दुल ठाकूर

भारताविरूद्धच्या चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४ धावांवर आटोपला. पहिल्या डावांत मिळालेल्या ३३ धावांच्या आघाडीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला विजयसाठी ३२८ धावांचे आव्हान दिले. स्टीव्ह स्मिथचं अर्धशतक (५५) आणि इतर फलंदाजांच्या छोटेखानी खेळी यांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने तीनशेनजीक मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या शेपटाला गुंडाळण्यात मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांनी मोलाचा वाटा उचलला. शार्दुलने अष्टपैलू कामगिरी करत कपिल देव आणि इरफान पठाण यांसारख्या दिग्गजांच्या पंगतीत स्थान पटकावले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या डावात शार्दुलने ९४ धावा देत ३ बळी टिपले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या डावात ६१ धावा देत ४ बळी टिपण्याची कामगिरी केली. तसेच फलंदाजी करताना आपल्या दुसऱ्याच कसोटीत त्याने दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ९ चौकार आणि २ षटकार लगावत ६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियामध्ये एकाच सामन्यात ५ पेक्षा जास्त बळी आणि ५० पेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शार्दुलला स्थान मिळाले. या यादीत भारताचा माजी कर्णधार कपिल देव आणि इरफान पठाण यांचाही समावेश आहे.

आणखी वाचा- मराठमोळ्या शार्दुलच्या ‘त्या’ कृतीचा प्रत्येक भारतीयाला वाटतोय अभिमान

आणखी वाचा- IND vs AUS: ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलने केला कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेला विक्रम

याशिवाय, ६० किंवा त्यापेक्षा जास्त धावा, ७ किंवा त्यापेक्षा जास्त बळी आणि २ किंवा त्यापेक्षा जास्त झेल टिपणारा शार्दुल हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला. त्याच्या व्यतिरिक्त आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाला हा पराक्रम करता आलेला नाही. दरम्यान, पहिल्या डावात ३३ धावांची आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २९४वर आटोपला. स्टीव्ह स्मिथने दमदार अर्धशतक (५५) ठोकलं. डेव्हिड वॉर्नर (४८), मार्कस हॅरिस (३८) आणि कॅमेरॉन ग्रीन (३७) या तिघांनीही चांगल्या छोटेखानी खेळी केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2021 2:54 pm

Web Title: shardul thakur equals record of kapil dev irfan pathan of taking 5 wickets and 50 runs in test in australia vjb 91
Next Stories
1 जिंकलस भावा… पाच विकेट्स घेणाऱ्या सिराजला ड्रेसिंग रुमच्या वाटेवर मिळाली खास झप्पी
2 IND vs AUS: ‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुलने केला कोणत्याही भारतीय खेळाडूला न जमलेला विक्रम
3 IND vs AUS: अजिंक्य रहाणेचा मोठेपणा; पंचांना सांगून मॅच बॉल दिला मोहम्मद सिराजला
Just Now!
X