28 September 2020

News Flash

अख्तरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी, PCB च्या निवड समितीचं अध्यक्षपद मिळण्याचे संकेत

मिसबाहची उचलबांगडी होण्याची शक्यता

पाकिस्तानी संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरच्या खांद्यावर येत्या काही दिवसांत नवीन जबाबदारी येण्याची शक्यता आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचं अध्यक्षपद शोएब अख्तरला मिळण्याची शक्यता आहे. सध्या मिसबाह उल-हक कडे पाक क्रिकेट बोर्डाचं निवड समिती प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक अशी दोन्ही महत्वाची पद आहेत. परंतू नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानची कामगिरी अतिशय खराब झाली. ज्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड मिसबाहची निवड समिती प्रमुख पदावरुन उचलबांगडी करण्याच्या तयारीत आहे.

“हो, हे खरं आहे. पाक क्रिकेट बोर्डाने मला निवड समिती प्रमुख पदावर काम करण्याबद्दल विचारलं आहे. याबाबत माझी पाक क्रिकेट बोर्डातील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून मला ही नवीन जबाबदारी घ्यायला आवडेल. परंतू अद्याप काही गोष्टींवर चर्चा सुरु आहे, त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही.” Cricket Baaz या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना शोएब अख्तरने या वृत्ताला दुजोला दिला. परंतू चर्चेचा अधिक तपशील सांगण्यास अख्तरने नकार दर्शवला. त्यामुळे येत्या काही दिवसांत शोएब अख्तर आपल्याला एका नवीन भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 11:52 am

Web Title: shoaib akhtar to replace misbah ul haq as pakistans chief selector player says discussions on psd 91
Next Stories
1 CPL 2020 : बॉल शोधण्यासाठी खेळाडूंची शोधमोहीम, प्रेक्षकांविना क्रिकेट सामन्यांचा असाही तोटा
2 CPL 2020 : त्रिंबागो नाईट रायडर्सला विजेतेपद, ८ गडी राखून जिंकला सामना
3 दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डावर सरकारी कारवाई, कारभाराची चौकशी होणार
Just Now!
X