यंदाच्या आयपीएलनंतर, भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी साउथम्पटन येथे जाणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या या सामन्यासाठी सर्व चाहते आतूर आहेत. त्यामुळे कसोटी संघाचा भाग नसलेले खेळा़डू घरीच असणार आहेत. मात्र, मु्ंबईकर फलंदाज श्रेयस अय्यरने एक वेगळी रणनीती आखली आहे.

इंग्लंडला जाणार श्रेयस अय्यर</strong>

कसोटी क्रिकेटमध्ये संधी निर्माण करण्यासाठी श्रेयस इंग्लंडला रवाना होणार असल्याची माहिती समोर आली आहे. 2021च्या पर्वात श्रेयस लँकेशायर संघातर्फे रॉयल लंडन कप स्पर्धेत खेळणार आहे. 15 जुलै 2021 रोजी तो मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे पोहोचेल. येत्या काळात श्रेयस इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळताना दिसू शकतो. त्यामुळे त्याला भारताच्या कसोटी संघात मधल्या फळीत स्थान मिळू शकेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात येत आहे.

रॉयल लंडन कपबाबत

एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणार्‍या रॉयल लंडन कपचा नवीन हंगाम 22 जुलैपासून सुरू होणार असून तो 19 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावेळी भारतीय संघही इंग्लंडच्या दौर्‍यावर असणार आहे, कारण दोन देशांमधील कसोटी मालिका जुलैमध्ये होणार आहे. याशिवाय भारत आणि इंग्लंड यांच्यातही मर्यादित षटकांची मालिका खेळली जाईल. अशा परिस्थितीत मर्यादित षटकांच्या मालिकेच्या तयारीसाठी श्रेयस अय्यर रॉयल लंडन कपमध्ये लँकेशायरकडून खेळेल.

इंग्लंडची काउंटी चॅम्पियनशिप खूप प्रसिद्ध आहे, जगभरातील खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. कोरोना विषाणूच्या साथीमुळे या स्पर्धेचे नवीन वेळापत्रक अद्याप समोर आलेले नाही. आर अश्विन, चेतेश्वर पुजारा हे भारतीय क्रिकेटपटू काउंटी क्रिकेटमध्ये खेळले आहेत. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही एका संघाशी करार केला होता, परंतु तो तंदुरुस्त नसल्याने खेळू शकला नाही.