News Flash

फ्रेंच ओपन : महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिमोना हालेप विजयी, जिंकले पहिले ग्रॅण्ड स्लॅम

अमेरिकेच्या स्लोन स्टिफन्सला नमवले

संग्रहित

फ्रेंच ओपनमध्ये महिला एकेरीच्या पहिल्या सामन्यात रोमानियाची सिमोना हालेप विजयी ठरली आहे. तिने अमेरिकेच्या स्लोन स्टिफन्सला नमवत तिने विजय मिळवला आहे. सिमोनाने आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद जिंकले आहे. सिमोना हालेपने स्लोन स्टिफन्सला ३-६, ६-४, ६-१ अशा सेटमध्ये हरवले.

तिसऱ्यांदा फ्रेंच ओपन फायनलमध्ये उतरलेल्या सिमोना हालेपने २ तास ३ मिनिटांमध्ये स्टिफन्सचे आव्हान धुवून काढले. ४० वर्षांत ग्रँड स्लॅम मिळवणारी सिमोना हालेप ही रोमानियाची पहिली खेळाडू ठरली आहे.

२६ वर्षांच्या सिमोना हालेपने २०१४ आणि २०१७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती. मात्र तिला पराभव स्वीकारावा लागला. तर याच वर्षी ऑस्ट्रेलियन ओपनमच्या फानलमध्ये हालेपला डेन्मार्कच्या कॅरोलिन वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागला होता.

सिमोना हालेपने स्पेनच्या गारबाइन मुगुरुजाचा ६-१, ६-४ ने पराभव करत फ्रेंच ओपनच्या फायनलमध्ये प्रवेश केला होता. आज सिमोनाने आपल्या कारकिर्दीतले पहिले ग्रँड स्लॅम जिंकले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2018 9:07 pm

Web Title: simona halep beats sloane stephens 3 6 6 4 6 1 in the womens final to win frenchopen
Next Stories
1 भावनिक ट्विट करत न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा
2 Women’s Asia Cup T20 : …तर अंतिम सामन्यात पुन्हा भारत-पाकिस्तान आमनेसामने
3 हरयाणा सरकारला अखेर शहाणपण; ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला स्थगिती
Just Now!
X