News Flash

सिंधू, जयराम माघारी मलेशिया बॅडमिंटन

युवा पी.व्ही. सिंधू आणि अजय जयरामला यांना मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले.

| January 18, 2015 04:05 am

युवा पी.व्ही. सिंधू आणि अजय जयरामला यांना मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. हे दोघेही पराभूत झाल्याने स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.
दोन वेळा जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या सिंधूला जपानच्या ओखुहारा नोझोमीने २१-१९, १३-२१, २१-१८ असे नमवले. कोरियाच्या ह्य़ुयेक जिन जिऑनने अजय जयरामवर १०-२१, २१-१७, २१-१६ अशी मात केली. पहिला गेम जिंकत अजयने आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यानंतर जिऑनच्या झंझावाती खेळासमोर अजय निष्प्रभ ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2015 4:05 am

Web Title: sindhu jayaram lose in malaysia
टॅग : Badminton,Sindhu
Next Stories
1 कबड्डी : महाराष्ट्र उपांत्यपूर्व फेरीत
2 ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी
3 सिंधू, अजयची विजयी घोडदौड
Just Now!
X