24 November 2020

News Flash

स्मृती मंधानाच्या कामगिरीची राज्य सरकारकडून दखल, शिवछत्रपती पुरस्काराने करणार सन्मान

राज्यपालांच्या हस्ते होणार सन्मान

भारतीय महिला क्रिकेट संघाची उप-कर्णधार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सांगलीचं नाव मोठं करणारी स्मृती मंधानाच्या कामगिरीची राज्य सरकारने दखल घेतली आहे. 2017-18 च्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली असून, स्मृतीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याची घोषणा केली. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरुप असणार आहे. 17 फेब्रुवारीला राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते खेळाडूंचा सन्मान केला जाणार आहे.

नुकत्याच न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत स्मृतीने आपल्या फलंदाजीने सर्वांची मन जिंकली. तिन्ही सामन्यांमध्ये स्मृतीने भारतीय संघाचा भार आपल्या खांद्यांवर समर्थपणे वाहत आपली भूमिका चोख बजावली. भारतीय महिला संघ मालिकेत एकही सामना जिंकू शकला नसला तरीही स्मृतीने केलेल्या कामगिरीचं फळ तिला मिळालं. आयसीसीच्या टी-20 क्रमवारीत स्मृती मंधाना सर्वोत्तम 3 फलंदाजांमध्ये आली. या बहुमानानंतर राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्यामुळे स्मृतीचा आनंद अधिकच द्विगुणीत होणार आहे.

एकूण 88 खेळाडूंना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, मल्लखांबाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळवून देणारे उदय देशपांडे यांना जीवन गौरव तर माऊंट एव्हरेस्ट, किलीमांजरो सारखी शिखरं सर करणाऱ्या प्रियंका मोहितेला साहसी पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 13, 2019 1:50 pm

Web Title: smriti mandhana awarded prestigious state shivchatrapati sports award
टॅग Smriti Mandhana
Next Stories
1 जॉन्टी ऱ्होड्सने जाहीर केले सर्वोत्तम ५ क्षेत्ररक्षक, ‘या’ भारतीय खेळाडूला मिळालं स्थान
2 विदर्भाच्या अक्षय कर्णेवारची ‘दुहेरी’ गोलंदाजी, पंचही पडले बुचकळ्यात
3 IPL 2019 : चुका प्रत्येकाकडून होतात, स्मिथचं संघात स्वागत – अजिंक्य रहाणे
Just Now!
X