भारताच्या पाचव्या मानांकित स्नेहल मानेने कुमारांच्या मॉरिशस खुल्या टेनिस स्पर्धेत अजिंक्यपदाला गवसणी घातली. या मोसमातील दुसऱ्या आठवडय़ातील तिचे हे दुसरे विजेतेपद आहे.
पुण्यातील १६ वर्षीय स्नेहलने अंतिम फेरीत सहावी मानांकित अॅमेली बोय हिच्यावर ६-३, ६-० असा सफाईदार विजय मिळवला. तिने पहिल्या सेटमध्ये दोन वेळा सव्र्हिस ब्रेक नोंदविला. हे ब्रेक नोंदविताना तिने पासिंग शॉट्सचा सुरेख खेळ केला. दुसऱ्या सेटमध्ये तिने केलेल्या वेगवान खेळापुढे अॅमेली हिचा बचाव निष्प्रभ ठरला. या सेटमध्ये स्नेहलने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा प्रभावी उपयोग केला. तिने विजेतेपदाबरोबरच ३० मानांकन गुणांची कमाई केली. याआधी तिने मॉरिशसमध्ये झालेल्या पेटिट कॅम्प चषक स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले होते. त्या स्पर्धेत तिने ४० मानांकन गुण मिळवले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2015 2:08 am