26 September 2020

News Flash

गतविजेत्या स्पेनचा खेळ खल्लास!

पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सने खुर्दा उडविल्यानंतर गतविजेत्या स्पेन संघाला दुसऱया सामन्यात चिली संघानेही जोरदार धक्का दिला आहे. चिली संघाने स्पेनला २-० ने धूळ चारली.

| June 19, 2014 06:57 am

पहिल्याच सामन्यात नेदरलँड्सने खुर्दा उडविल्यानंतर गतविजेत्या स्पेन संघाला दुसऱया सामन्यात चिली संघानेही जोरदार धक्का दिला आहे. चिली संघाने स्पेनला २-० ने धूळ चारली. या पराभवामुळे गतविजेत्या स्पेनचे विश्वचषकातून ‘पॅकअप’ झाले आहे.
नेदरलँड्सचा निसटता विजय
सामन्याच्या २० व्या मिनिटाला चिलीच्या वरगासने शानदार गोल करत स्पेनला पहिला झटका दिला. पहिल्या झटक्यानंतर सावरू पाहणाऱया स्पेनला ४३ व्या मिनिटाला चिलीच्या चार्लेसने दमदार गोल करून दुसरा धक्का दिला. त्यानंतर चिलीचा संघाची आत्मविश्वासी खेळी पहायला मिळाली, तर स्पेनचा संघ चिलीने निर्माण केलेल्या दबावाच्या सावटाखाली पूर्णपणे ढासळताना दिसला. मध्यांतरानंतर स्पेन पुनरागमन करेल अशी अटकळ होती परंतु, तसेही काही झाले नाही. स्पेनला मध्यांतरानंतर अपयशच हाती आले. या विश्वचषकातील स्पेनच्या खेळीकडे पाहता हा नक्की गतविजेता संघ आहे ना? असा प्रश्न पडावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2014 6:57 am

Web Title: soccer spain reign ends as chile prove too hot to handle
Next Stories
1 फुटबॉलची नशा!
2 लख लख सोनेरी केसांची..
3 कर्झाकोव्हने रशियाला तारले
Just Now!
X