नवी दिल्ली : भारतात पुढील वर्षी क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, असा आशावाद के ंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त के ला. करोनामुळे मार्च महिन्यापासून देशात एकही क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही. गेल्या काही आठवडय़ांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंनी आपल्या सरावाला सुरुवात के ली आहे.

‘‘ऑक्टोबर महिन्यापासून क्रीडा स्पर्धाचे आयोजन शक्य होईल, असे सुरुवातीला मला वाटत होते, पण देशातील करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढतच आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे शक्य नाही. लवकरच करोनावरील लस आल्यानंतर पुढील वर्षीच्या सुरुवातीला क्रीडा स्पर्धाना पुन्हा सुरुवात होईल,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या ६४ लाखांच्या वर गेली आहे.