3आंतरराष्ट्रीय ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. तर सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू या भारतातील अव्वल महिला बॅडमिंटनपटूंनी दुसरी फेरी गाठली आहे.
गतवर्षी चायना सुपर सीरिज प्रीमियर स्पर्धा जिंकण्याची किमया साधणाऱ्या श्रीकांतने मलेशियाच्या कियान मेंग टानचा १८-२१, २१-१३, २२-२० असा पराभव केला, तर तिसऱ्या मानांकित कश्यपने अंकित छिकाराला २१-७, २१-१४ अशा फरकाने पराभूत केले.
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने मलेशियाच्या यिन फन लिमचा २१-१७, २१-१२ असा पराभव केला, तर दोन वेळा विश्व अजिंक्यपद कांस्यपदकविजेत्या सिंधूने पात्रता फेरीचा अडसर पार करून आलेल्या एकता कालियाचा २१-६, २१-१२ अशा फरकाने पराभव केला.
याशिवाय अजय जयराम, अरविंद भट, एच. एस. प्रणॉय, आरएमव्ही गुरुसाईदत्त, सौरभ वर्मा आणि बी. साईप्रणित यांनी दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले आहे. तर महिलांमध्ये रितूपर्ण दास, अरुंधती पाणतावणे यांनी आगेकूच केली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 22, 2015 5:54 am