चेंडूशी छेडछाड प्रकरणानंतर एक वर्षांहून अधिक काळानंतर स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे ऑस्ट्रेलियाच्या संघात परतण्याच्या तयारीत आहेत.

ब्रिस्बेनमधील विश्वचषक स्पर्धेसाठी सुरू झालेल्या सराव शिबिरात दोघांचेही संघसहकाऱ्यांनी स्वागत केले. विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडसमवेत तीन सराव सामने खेळून ऑस्ट्रेलियाच्या अभियानाला प्रारंभ होणार आहे. गत दोन-तीन दिवसांपासून दोघांनाही ताप आल्याने ते सरावास नव्हते.

‘‘स्मिथ आणि वॉर्नर हे दोघेही तंदुरुस्त होतील आणि संघात पुनरागमन करतील. आयपीएलच्या १२ सामन्यांमध्ये ६९२ धावा फटकावून वॉर्नर जबरदस्त लयीत आलेला असून स्मिथसुद्धा दमदार कामगिरी करीत असल्याने संघासाठी हा शुभसंकेत आहे. त्यामुळे विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची बाजू अधिक भक्कम होईल,’’ असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने सांगितले.