09 March 2021

News Flash

पंतप्रधान मोदींच्या पत्रानंतर रैनाचं भावनिक ट्विट, म्हणाला…

पंतप्रधान मोदी यांनी पाठवलेले पत्रदेखील केलं पोस्ट

भारताचा तडाखेबाज फलंदाज सुरेश रैना याने १५ ऑगस्टला निवृत्ती जाहीर केली. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अवघ्या काही मिनिटांतच रैनाने निवृत्तीची घोषणा केली. रैनाने सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केल्यानंतर मग BCCIला अधिकृतरित्या निवृत्ती घेण्याबद्दल संपर्क साधला. BCCIने या गोष्टीचे स्पष्टीकरण देत त्याच्या निर्णयाचा आदर केला आणि त्याच्या क्रिकेटमधील कार्यालादेखील सलाम केला. त्यानंतर थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पत्राच्या माध्यमातून रैनाच्या कारकिर्दीला सलाम करत त्याचे अभिनंदन केले.

धोनीप्रमाणेच रैनानेही पंतप्रधान मोदी यांच्याकडून आलेल्या पत्राचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले. या पत्राबद्दल आभार मानताना रैनाने भावनिक ट्विटदेखील केले. “आम्ही आमच्या देशासाठी खेळताना आमचं सर्वस्व पणाला लावतो आणि घाम गाळतो. देशातील नागरिकांकडून आणि चाहत्यांकडून मिळणारं प्रेम हेच आमच्यासाठी प्रेरणास्थान असतं. त्यातच देशाच्या पंतप्रधानांनी आमची पाठ कौतुकाने थोपटणं हा तर सर्वोच्च सन्मान आहे. यापेक्षा आणखी वेगळं काय हवं… पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी मी भरून पावलो. जय हिंद!”, अशा शब्दात रैनाने पत्राबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकाच दिवशी निवृत्ती स्वीकारणाऱ्या धोनी आणि रैनाबद्दल आपल्या भावना पत्राद्वारे व्यक्त केल्या. पत्रात मोदी यांनी या दोन खेळाडूंच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल त्यांचे आभार मानले आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दरम्यान, आता धोनी आणि रैना टीम इंडियाकडू खेळताना दिसणार नसले, तरी क्रिकेट मैदानावर त्यांच्या फलंदाजीची आतषबाजी मात्र चाहत्यांना अनुभवता येणार आहे. १९ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या IPL 2020मध्ये दोघेही चेन्नई संघाकडून खेळणार आहेत. केवळ चेन्नईचेच चाहते नव्हे, तर सर्व जगभरातील क्रिकेट चाहते या दोघांच्या फलंदाजीची झलक बघण्यासाठी आता आतुर झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 1:19 pm

Web Title: suresh raina becomes emotional over pm narendra modis congratulatory letter tweets his reaction vjb 91
Next Stories
1 “मुरलीधरनची बोटं तोडून टाक”; पाकिस्तानी फलंदाजाने अख्तरकडे केली होती मागणी
2 …म्हणून करोनाचा धोका पत्करून जोकोविचचा US OPENमध्ये सहभाग
3 क्रीडा पुरस्कारांच्या रकमेत वाढ?
Just Now!
X