News Flash

ना धोनी, ना युवराज, ना गंभीर… या खेळाडूमुळे जिंकलो विश्वचषक – सुरेश रैना

नक्की आहे तरी कोण हा 'स्पेशल' खेळाडू? जाणून घ्या

भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद देणारी एक घटना ९ वर्षांपूर्वी, २ एप्रिल २०११ ला घडली. भारतीय क्रिकेट संघाने आयसीसीच्या एकदिवसीय विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा थरार शेवटच्या षटकापर्यंत रंगला. पण अखेर तेव्हाचा भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने षटकार लगावत भारताला विश्वचषक मिळवून दिला. त्या सामन्यात धोनीने नाबाद ९१ तर गौतम गंभीरने ९७ धावांची खेळी केली. याशिवाय तडाखेबाज युवराज सिंग याने स्पर्धेत अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे त्याला मालिकावीराचा किताब मिळाला. पण त्यावेळी संघाचा सदस्य असलेला सुरेश रैना याने मात्र या विश्वचषक विजयाचे श्रेय या तिघांपैकी कोणालाही न देता चौथ्याच खेळाडूला दिले आहे.

विराटला गोलंदाजी की बुमराहसमोर फलंदाजी? महिला क्रिकेटपटूने दिलं हे उत्तर

सचिन आणि विराट दोघांनी खूप शतके ठोकली आहे. विश्वचषकाच्या वेळी विराटचा विचार होता की प्रत्येक सामना भारताने जिंकायलाच हवा. तर सचिनचं म्हणणं होतं की जे काहीही करायचं आहे ते शांतपणे करूया. तो स्वत: वातावरण शांत आणि दडपणविरहित ठेवण्यासाठी प्रयत्नशील असायचा. सचिनबरोबर खेळताना एक गोष्ट शिकण्यासारखी होती, ती म्हणजे त्याचा शांत स्वभाव. सचिन होता म्हणूनच आम्ही विश्वचषक स्पर्धा जिंकू शकलो. त्याने साऱ्या खेळाडूंमध्ये विश्वास जागवला की आपण विश्वचषक जिंकण्याची पात्रता राखतो. तो जणू काही आमचा दुसरा प्रशिक्षकच होता”, असे रैनाने हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितले.

रैनाने विराटच्या आतापर्यंतच्या कामगिरीचेही कौतुक केले. “विराट कोहली… तो सगळ्याच प्रकारच्या क्रिकेट प्रकारांमध्ये अप्रतिम कामगिरी करतो. विराट एक अतिशय चांगला कर्णधार आहे. तो फलंदाज म्हणूनही उत्तम आहे. मुख्य म्हणजे तो तंदुरूस्त आहे, त्यामुळे तो बऱ्याच वेळा चांगल्या लयीत असतो. त्याने त्याच्या कामगिरीच्या जोरावर त्याच्याभोवती एक वलय निर्माण केले आहे. सचिन आणि विराट या दोघांसोबतही मला खेळायला मिळाले याचा मला आनंद आहे”, असे रैना म्हणाला.

मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी एलिस पेरीने ठेवली एक अट

दरम्यान, करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगात दहशतीचे वातावरण आहे. अनेकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या साऱ्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाला असून अनेक छोट्या-मोठ्या स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2020 9:11 am

Web Title: suresh raina credits sachin tendulkar calmness for team india 2011 world cup victory ms dhoni yuvraj singh gautam gambhir vjb 91
Next Stories
1 ..तर ऑस्ट्रेलियापुढे महासंकट!
2 चहल सध्याचा सर्वोत्तम फिरकीपटू
3 जागतिक जलतरण अजिंक्यपद स्पर्धा एका वर्षांने लांबणीवर
Just Now!
X