भयंकर अशा करोना व्हायरसमुळे लाखो लोकांना फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतातील सर्वाधिक लोकप्रिय IPL चे आयोजनही अनिश्चित काळासाठी लांबणीवर ढकलण्यात आले आहे. घरबसल्या काही क्रिकेटपटू पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत. तर अनेक क्रीडापटू लाइव्ह चॅटच्यामार्फत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत.

मुरली विजयसोबत डिनर डेटवर जाण्यासाठी एलिस पेरीने ठेवली एक अट

२०१९ च्या हंगामातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू ठरलेली ऑस्ट्रेलियाची एलिस पेरी हिने एका क्रीडा वाहिनीशी इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. महिला अँकर रिदिमा पाठक हिने तिची मुलाखत घेतली. त्या मुलाखती दरम्यान तिला रॅपिड फायर प्रकारचे प्रश्न विचारले. असा रंगला रॅपिड फायरचे थरार…

१. शेवटच्या षटकात ६ धावांच्या बचावासाठी गोलंदाजी की शेवटच्या षटकात २० धावा हव्या असताना फलंदाजी?
पेरी – २० धावा हव्या असताना फलंदाजी

२. जसप्रीत बुमराहसमोर फलंदाजी की विराटला गोलंदाजी?
पेरी – विराटला गोलंदाजी

३. २०२१ च्या विश्वचषक अंतिम फेरीत भारताशी सामना करायला आवडेल की इंग्लंडशी?
पेरी – मला भारताशी खेळायला आवडेल

४. निवृत्तीनंतर प्रशिक्षक की समालोचक?
पेरी – प्रशिक्षक

५. अ‍ॅशेसमधील विजय की विश्वचषक विजेतेपद?
पेरी – आता नीटसं सांगता येणार नाही .. पण कदाचित अ‍ॅशेस

६. लॉर्ड्सवर शतक की मेलबर्नच्या मैदानावर हॅटट्रिक?
पेरी – लॉर्ड्सवर शतक

७. क्रिकेटपटू नसतीस तर … महिला फुटबॉल विश्वचषक की रॉजर फेडररसोबत मिश्र दुहेरी?
पेरी – मिश्र दुहेरी

टीम इंडियातलं चहलचं टोपणनाव माहिती आहे का?

मुरली विजयसोबत डिनर डेट…

मुरली विजयने इस्टाग्राम लाईव्ह चॅटमार्फत चाहत्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याला लाईव्हमध्ये ‘तुला कोणासोबत डिनर डेटवर जाण्यास आवडेल?’ असा प्रश्न विचारला होता. यावर टीम इंडियाचा फलंदाज मुरली विजय याने ऑस्ट्रेलियाची स्टार क्रिकेटपटू सौंदर्यवती एलिस पेरी हिच्यासोबत डिनर डेटला जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. या इच्छेवर आता एलिस पेरीने रिप्लाय दिला. “डेटवर जायला मी तयार आहे, पण एका अटीवर… त्याने बिल भरायला हवं. तो डेटचे पैसे भरत असेल, तर मी डेटवर नक्की जाईन. तो खूप चांगला माणूस आहे’, असे उत्तर एलिस पेरीने दिले.