18 January 2021

News Flash

सुशांत मृत्यू प्रकरण: CSKचा बड्या खेळाडूचं महत्त्वाचं ट्विट

पंतप्रधान मोदी यांनाही केलं टॅग

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू १४ जूनला झाला. प्रथमदर्शनी आत्महत्या वाटणाऱ्या या प्रकरणाला हळूहळू वेगळेच वळण लागताना दिसत आहे. सुरूवातीला या प्रकऱणाचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. मात्र आता सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रकरणी सध्या संशयाची सुई अभिनेत्री आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्याभोवतीच आहे. सीबीआयमार्फत या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांशी चौकशी सुरू आहे. त्याचदरम्यान नुकतीच आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर केलेला चेन्नई सुपर किंग्जचा बडा खेळाडू सुरेश रैना याने खास ट्विट केले आहे.

IPL 2020साठी युएईमध्ये दाखल झाल्यानंतर त्याने प्रथमच सुशांत प्रकरणावर भाष्य केले. त्याने एक व्हिडीओ ट्विट केला. रैना आपल्या रूममध्ये येताना दिसतो आणि तेथे आयपॅडवर सुशांतचा फोटो दिसतो असा तो व्हिडीओ आहे. त्या व्हिडीओसोबत त्याने एक भावनिक संदेशही लिहीला.

“भावा, तू आमच्या हृदयात कायम राहशील. तुझे चाहते तुला सर्वात जास्त मिस करत आहेत. माझा सरकार आणि नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे. सर्व प्रकारचा तपास करून तुला नक्की न्याय मिळेल”, असे त्याने ट्विट केले. याचसोबत त्याने #GlobalPrayersforSSR, #JusticeforSSR हे हॅशटॅग वापरून ट्विटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 10:06 am

Web Title: sushant singh rajput death case cricketer suresh raina joins justice for ssr campaign tweets tagging pm modi vjb 91
Next Stories
1 चॅम्पियन्स लीग फुटबॉल : बायर्न म्युनिक अजिंक्य
2 बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : वीजपुरवठा खंडित प्रकरणानंतर भारतीय बुद्धिबळ महासंघाला जाग
3 देशांतर्गत क्रीडा स्पर्धाना लवकरच प्रारंभ -रिजिजू
Just Now!
X