News Flash

सुशीलचा मला मारण्याचाच डाव होता -परवीन

राष्ट्रकुल चाचणी स्पर्धेच्या वेळी या दोन्ही मल्लांच्या पाठिराख्यांमध्ये हाणामारी झाली होती.

| January 9, 2018 02:23 am

परवीन राणा

ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारा मल्ल सुशील कुमारने मला जीवे मारण्यासाठीच माणसांना प्रोत्साहन केले होते, असा थेट आरोप त्याचा प्रतिस्पर्धी परवीन राणाने केला आहे.  राष्ट्रकुल चाचणी स्पर्धेच्या वेळी या दोन्ही मल्लांच्या पाठिराख्यांमध्ये हाणामारी झाली होती.

राणाने सांगितले,‘‘आमची कुस्ती संपल्यानंतर माझ्याकडे बोट दाखवीत सुशीलने काही जणांना ‘हाच तो राणा; त्याच्याकडे पाहून घ्या’ असे सुचविले होते. मला मारण्याचाच त्याचा डाव असावा, म्हणूनच त्याची काही माणसे आमच्यावर धावून आली. माझ्या भावाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्या अंगावर खुर्ची फेकण्यात आली. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे.’’

राणाने कुस्ती खेळताना आपला चावा घेतल्याचा आरोप सुशीलने केला आहे. त्याबाबत राणा म्हणाला, ‘‘असा कोणताही अनुचित प्रकार मी केलेला नाही. उलट सुशीलने माझे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2018 2:22 am

Web Title: sushil kumar wants to hit me says parveen rana
Next Stories
1 धोनीच्या नावावर जमा असलेला विक्रम वृद्धीमान साहाकडून मोडीत
2 टाचेच्या दुखापतीमुळे डेल स्टेनची भारताविरुद्ध मालिकेतून माघार
3 सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू राखीव, मात्र खराब कामगिरी करणारा खासदारपुत्र दिल्लीच्या संघात
Just Now!
X