झारखंडचा कर्णधार आणि यष्टीरक्षक इशान किशनने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत विक्रमी खेळीची नोंद केली आहे. जम्मू काश्मीरविरुद्ध सामन्यात शतक झळकावत इशान टी-20 क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला यष्टीरक्षक-कर्णधार ठरला आहे. 20 वर्षीय इशान किशनने 55 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे झारखंडने जम्मू काश्मीरचं 169 धावांचं आव्हान 9 गडी राखून पूर्ण केलं.

किशनने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 7 षटकार लगावत गोलंदाजांची धुलाई केली. या कामगिरीसह इशान किशन टी-20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी मोईन खान, गिलख्रिस्ट, कामरान अकमल आणि उपुल थरंगा यांनी अशी कामगिरी करुन दाखवली आहे. यंदाच्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतलं हे चौथ शतक ठरलं. याआधी चेतेश्वर पुजारा, श्रेयस अय्यर, अभिमन्यू इश्वरन यांनी आपापल्या संघाकडून शतकं लगावली आहेत.