News Flash

IND vs AUS: नटराजनची पहिल्याच कसोटीत भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी

पाहा नक्की काय केला पराक्रम

टी नटराजन (सौजन्य - सोशल मीडिया)

ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटीत भारतीय क्रिकेट संघात दोन खेळाडूंना कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी या कसोटीतून क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शुभमन गिल आणि मोहम्मद सिराजने मेलबर्न कसोटीतून पदार्पण केले होते. त्यानंतर आज सुंदर आणि नटराजनला संधी मिळाली. यातील नटराजनचे कसोटी पदार्पण हे खास ठरले. नटराजनने या कसोटीत एक विक्रम केला.

आणखी वाचा- IND vs AUS: नटराजनने मैदानात उतरताच रचला इतिहास; ‘असा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय

वेगवान गोलंदाज नटराजनचे कसोटी पदार्पण खास ठरले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामुळे नटराजनला पदार्पणाची संधी मिळाली. याच दौऱ्यात एकदिवसीय मालिका आणि टी२० मालिका अशा दोन्ही मालिकेतदेखील नटराजनने दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संधी मिळवत पदार्पण केले होते. एकाच दौऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण करणारा नटराजन पहिला भारतीय खेळाडू ठरला. त्यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे त्याने अनुभवी गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या विक्रमाशी बरोबरी केली. क्रिकेटच्या एकाच हंगामात (२०२०-२१) तिन्ही फॉरमॅटमध्ये पदार्पण करणारा नटराजन भुवीनंतरचा दुसरा भारतीय ठरला.

Video: दणक्यात पदार्पण! स्मिथला बाद करण्यासाठी सुंदरने लढवली शक्कल अन्…

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे नटराजनला संधी देण्यात आली. त्याला गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्या हातून कसोटी कॅप मिळाली. नटराजन हा भारताकडून कसोटी पदार्पण करणारा ३००वा खेळाडू ठरला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2021 11:58 am

Web Title: t natarajan becomes only 2nd indian to make all three formats debut in the same season after team india pacer bhuvneshwar kumar aus v ind test vjb 91
Next Stories
1 Video : पृथ्वी शॉनं थ्रो केलेला चेंडू थेट रोहितच्या हातावर आदळला, अन्…
2 Video: दणक्यात पदार्पण! स्मिथला बाद करण्यासाठी सुंदरने लढवली शक्कल अन्…
3 नवदीप सैनीलाही दुखापत; भारतीय संघाच्या अडचणीत वाढ
Just Now!
X