विजयासाठीच्या १९३ धावांचा पाठलाग करताना महाराष्ट्राची अवस्था ८ बाद ७५ अशी झाली. ४३ धावांची आघाडी मिळालेल्या तामिळनाडूला दुसऱ्या डावात १४९ धावांचीच मजल मारता आली. अक्षय दरेकर आणि चिराग खुराणाने प्रत्येकी ४ बळी टिपले. दिनेश कार्तिक आणि बाबा अपराजित यांनी प्रत्येकी ३५ धावांची खेळी केली.
तामिळनाडूच्या भेदक गोलंदाजीसमोर महाराष्ट्राच्या फलंदाजांनी गुम्डघे टेकले. पाच फलंदाजांना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. गेल्या सामन्यातील त्रिशतकवीर केदार जाधवला भोपळाही फोडता आला नाही. लक्ष्मीपती बालाजी, औशिक श्रीनिवास, मलोलन रंगराजन आणि यो महेश यांनी प्रत्येकी २ बळी मिळवले. तामिळनाडूला विजयासाठी दोन विकेट्सची गरज असून महाराष्ट्राला ११८ धावांची आवश्यकता आहे.