न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताने ३-० अशी आघाडी घेतली. या तीनही सामन्यात भारताने एकतर्फी विजय मिळवला आणि विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने १० वर्षांनंतर न्यूझीलंडमध्ये त्यांच्याविरुद्ध एकदिवसीय मालिकेत विजय मिळवला. या तीन सामन्यात भारतीय कर्णधार विराट कोहलीने अनेक वैयक्तिक आणि सांघिक विक्रम मोडले. मात्र त्याच्यावरील मानसिक आणि शारीरिक ताण लक्षात घेता न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या २ एकदिवसीय सामन्यांसाठी आणि टी२० मालिकेसाठी विराटला विश्रांती देण्यात आली आहे.
या मोठ्या सुटीचे औचित्य साधून विराट आता Vacation Mode वर गेला आहे. त्याने पत्नी अनुष्का सोबत एक फोटो ट्विट केला आहे. अनुष्कासह विराट झकासपैकी सुटीवर निघाला आहे. त्याची ही सफरही ग्रॅंड असणार यात वादच नाही. त्याने ट्विट केलेल्या फोटोमध्ये एक खाजगी विमान दिसत असून या दोघांचे सामान दिसत आहे.
Away we go #travelswithher pic.twitter.com/KnDhMbAG3G
— Virat Kohli (@imVkohli) January 29, 2019
ट्विटर अकाउंटवरुन कोहलीने अनुष्कासह टाकलेल्या फोटोला ‘Travels With Her’ असा हॅशटॅगदेखील दिला आहे. दरम्यान, कोहली भारतासाठी मैदानावर खेळत असताना अनुष्काने बहुतांश सामन्यात स्टेडियममध्ये हजेरी लावली होती आणि टीम इंडियासोबत वेळ घालवला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 29, 2019 3:33 pm