तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजवर मात करत मालिकेत २-१ ने बाजी मारली. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ६७ धावांनी संघाने बाजी मारली. त्याआधी रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी केलेल्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने २४० धावांचा पल्ला गाठला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी १३५ धावांची शतकी भागीदारी केली.

अवश्य वाचा – IND vs WI : विराट-रोहितमधली बहुचर्चित शर्यत अखेरीस बरोबरीत

या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाशी बरोबरी केली आहे. सर्वाधिक २२ शतकी भागीदारी करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाशी भारताने बरोबरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकी भागीदाऱ्या करणारे संघ –

  • ऑस्ट्रेलिया/भारत – २२
  • इंग्लंड/पाकिस्तान – १६
  • दक्षिण आफ्रिका – १५

टी-२० मालिकेत बाजी मारल्यानंतर भारतीय संघ आता वन-डे मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १५ तारखेला पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे.

अवश्य वाचा – मुंबईच्या मैदानात विराटसेनेने रोखलं कॅरेबिअन वादळ, टी-२० मालिकेतही मारली बाजी