क्रिकेटचा देव आणि विक्रमांचा विक्रम करणारा सचिन तेंडुलकर नुकताच ऑनलाइन ट्रोलर्सचा नवा टार्गेट ठरला. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये सचिनने धोनीच्या संथ खेळीसंदर्भात केलेल्या टिप्पणीवरुन धोनीच्या चाहत्यांनी सचिनला ट्रोल केले आहे.

अफगाणिस्तानसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध खेळताना भारताने खूपच धिम्या गतीने फलंदाजी केली. यावर नाराज झालेल्या सचिनने मधल्या फळीतील फलंदाजांवर टिका केली. धोनी तसेच केदार जाधव यांच्यामध्ये सकारात्मक विचारसरणी दिसत नाही अशी टिका सचिनने केली. विश्वचषक स्पर्धेमध्ये पहिल्यांदात भारताचे सलामीवीर अयशस्वी ठरल्यानंतर कोहलीने ६७ धावांची खेळी केल्याने भारताला २२४ धावांपर्यंत मजल मारता आली. मधल्या फळीतील फलंदाजांनी अगदीच संथ गतीने फलंदाजी केल्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर खूपच नाराज झाला. त्याने इंडिया टुडेला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ही नाराजी बोलून दाखवली. ‘मी थोडा निराश झालो. यापेक्षा चांगली धावसंख्या उभारता आली असती. धोनी आणि केदार जाधवच्या भागीदारीबद्दलही नाखुश आहे. ते खूपच संथ खेळले. पण फिरकी गोलंदाजीची ३४ षटके खेळलो. त्यामध्ये आपण केवळ ११९ धावा केल्या. भारतीय संघ मधल्या फळीमध्ये कमकुवत दिसतो. मधल्या फळीतील फलंदाजांकडे सकारात्मक इच्छाशक्तीचा आभाव वाटला,’ असं सचिन सामन्याचे विश्लेषण करताना म्हणाला.

MS Dhoni First Player to Play 250 Matches for CSK
MI vs CSK IPL 2024 : एमएस धोनीने रचला इतिहास! चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला दुसरा खेळाडू
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Kinetic Green introduces E Luna an electric scooter for gig workers
गिग’ कामगारांसाठी आता ई-लुना, कायनेटिक ग्रीन कंपनीचे पाऊल; १३० दुचाकींचे वितरण
Bengaluru woman slammed for phone
स्कुटर चालवताना मोबाईलवर बोलण्यासाठी काकूंचा हटके जुगाड! व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात धोनी २७ व्या षटकात फलंदाजीसाठी आला. धोनी मैदानात आला तेव्हा ज्या प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत अगदी जोशात केले त्याच प्रेक्षकांनी अवघ्या ७५ मिनिटांमध्ये धोनीच्या संथ खेळीबद्दल नाराजी व्यक्त करत त्याची हूर्यो उडवली. धोनीने ५२ चेंडूमध्ये अवघ्या २८ धावा केल्या. विशेष म्हणजे धोनीला रशीदने बाद केले तेव्हा भारतीय प्रेक्षकांनीच आनंद व्यक्त केला कारण त्यांना या संथ खेळी ऐवजी हार्दिक पांड्याचा खेळ पाहण्याची इच्छा होती. धोनीच्या या खेळीवर सचिनने टिका केली. ‘धोनीसारख्या वरिष्ठ खेळाडूने त्यावेळी नेतृत्व करायला हवे होते. जाधवच्या वाट्याला या मालिकेत जास्त वेळा फलंदाजी करण्याची संधी आली नाही. त्यामुळे धोनीने फटकेबाजीसाठी पुढाकार घ्यायला हवा होता,’ असं सचिन म्हणाला. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी जाधव या मालिकेत केवळ पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. त्या खेळीतही तो केवळ आठ चेंडू खेळला होता. ‘केदारवर दबाव होता कारण तो याआधी फलंदाजीसाठी आला नव्हता. त्या परिस्थितीमध्ये समोरच्या फलंदाजाने नेतृत्व करण्याची गरज होती पण तसे झाले नाही. धोनी आणि केदार दोघांनाही चांगल्या सरासरीने फटकेबाजी करता आली नाही,’ असं मत सचिनने मांडले.

अनेकांनी धोनीच्या या संथ खेळीवर टिका केली असली तरी सचिनच्या टिकेनंतर धोनीचे चाहते चांगलेच खवळले आहेत. अनेकांनी ट्विटवरुन सचिनलाच चार गोष्टी ऐकवल्या आहेत. अनेकांनी सचिन आणि धोनीची तुलना करणारे मिम्स ट्विटवर पोस्ट केले आहेत. दबावाखाली धोनी हा सचिनपेक्षा चांगलाच खेळतो अशा टोला धोनीच्या चाहत्यांनी या मिम्सच्या माध्यमातून लगावला आहे.

माझ्यासाठी धोनी म्हणजे…

सचिन कायम स्वत:साठी खेळला

दोघांमधला फरक

दोघांच्या सिनेमेचे प्रेक्षक

ज्याने तुला विश्वचषक जिंकून दिला तो धोनी

शेवटच्या सामन्यातील दोघांच्या धावा

धोनीला शिकवण्याची गरज नाही

मुंबईकरांचा धोनी विरोध

विश्वचषक त्याच्यामुळे जिंकला

तुझं करियर पाहिलं तर

दोघांचे भांडण आणि…

तुझी आकडेवारी बघ आधी…

दरम्यान अफगाणिस्ताविरुद्धच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकात मोहम्मद शामीने घेतलेल्या हॅटट्रीकमुळे भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला. मात्र या सामन्यामध्ये भारतीय संघातील सर्वात नाजूक बाजू असणाऱ्या मधल्या फळीतील फलंदाजीबद्दल पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत असं क्रिकेटमधील जाणकार सांगतात.