23 February 2020

News Flash

आयपीएलचा लिलाव दरवर्षी होईल, विश्वचषकाची संधी एकदाच येते ! – राहुल द्रविड

लिलावावर नको सामन्यावर लक्ष केंद्रीत करा!

२७-२८ जानेवारीला रंगणार आयपीएलचा लिलाव

इंडियन प्रिमीअर लीग म्हणजेच IPL ची भारतीय क्रिकेटपटूंमध्ये असणारी क्रेझ ही सर्वश्रुत आहे. सध्या भारताचा U-19 संघ न्यूझीलंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत खेळतो आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामाचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीरोजी बंगळुरुत रंगणार आहे. भारताच्या U-19 संघातील काही खेळाडूंना यंदाच्या लिलावात चांगल्या रकमेची बोली मिळण्याची शक्यता आहे. मात्र भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या खेळाडूंना आयपीएल लिलावाऐवजी विश्वचषक स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे.

“होय, विश्वचषकाची स्पर्धा सुरु असली तरीही सध्या खेळाडूंमध्ये आयपीएलच्या लिलावाची चर्चा सुरु आहे. मात्र सध्या खेळाडूंचं लक्ष हे विश्वचषक स्पर्धेवर असणं गरजेचं आहे. आयपीएलचा लिलाव प्रत्येक वर्षी होणार आहे. विश्वचषकाची संधी ४ वर्षांत पुन्हा येणार नाही”, असं म्हणत मी खेळाडूंना बांगलादेशविरुद्धच्या सामन्यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. ESPNCricinfo या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राहुल द्रविड बोलत होता.

अवश्य वाचा – न्यूझीलंडला नमवत अफगाणिस्तानची अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक

भारतीय U-19 संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ, शुभमन गिल, हिमांशु राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, कमलेश नागरकोटी, शिवम मवी, अर्शदीप सिंह, हार्विक देसाई यासारख्या खेळाडूंना यंदाच्या लिलावात चांगली बोली लाण्याची शक्यता आहे. मात्र आयपीएल लिलावाच्या नादात खेळाडूंनी बांगलादेशविरुद्ध सामन्याची तयारी विसरु नये असा सल्ला राहुल द्रविडने आपल्या खेळाडूंना दिला आहे. बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकल्यास भारताची उपांत्य फेरीत पाकिस्तानशी गाठ पडणार आहे.

First Published on January 25, 2018 5:32 pm

Web Title: u 19 world cup 2018 new zealand indian coach rahul dravid advice indian team to focous on world cup ipl auction will come every year
टॅग IPL 2018
Next Stories
1 जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर सौरव गांगुली नाराज, आयसीसीला चौकशी करण्याची विनंती
2 हॉकी चौरंगी मालिका – भारताची बलाढ्य बेल्जियमवर मात
3 न्यूझीलंडला नमवत अफगाणिस्तानची अंडर १९ वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक
Just Now!
X