UEFA चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदला पराभवाचा धक्का बसला. स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने नुकतीच रियल माद्रिदला सोडचिठ्ठी दिली. त्याने ज्युव्हेंटस संघासह खेळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रियल माद्रिदला राउंड ऑफ १६ मधूनच गाशा गुंडाळावा लागला. अजॅक्स या संघाकडून त्यांना ४-१ अशा अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. या पराभवाबरोबरच रियल माद्रिदचे UEFA चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आव्हानदेखील संपुष्टात आले.

रात्री उशीरा सँटियागो बर्नब्यु स्टेडियममध्ये हा सामना रंगला. या सामन्यात अयाक्सने जबरदस्त खेळ केला. त्यांच्या आक्रमण फळीने रियल माद्रिदच्या गोलप[ओस्टवर जोरदार हल्ला चढवला. पूर्वाधात ७व्या मिनिटाला हकीम झियेच याने गोल करत अजॅक्सला १-० अशी आघाडी मिळवून दिला. पाठोपाठ १८ व्या मिनिटाला डेव्हिड निरासने आणखी गोल केला. त्यामुळे मध्यंतरापर्यंत अजॅक्स २-० अशा आघाडीवर होता.

उत्तरार्धात अजॅक्सकडून ६२ व्या मिनिटाला टेडीसने गोल केला आणि आघाडी ३-० अशी वाढवली. दरम्यान मार्को असेन्सिओने ७०व्या मिनिटाला रियल माद्रिदकडून गोल केला. पण ७२ व्या मिनिटाला शोन याने गोल करत पुन्हा आघाडी ४-१ अशी वाढवली. निर्धारित ९० मिनिटांच्या खेळात ही आघाडी कायम राहिली. त्यानंतरच्या अतिरिक्त वेळेत तिसऱ्या मिनिटाला नाचोने रियल माद्रिदकडून गोल केला पण त्याला रेड कार्ड दाखवण्यात आले आणि गोल अमान्य करण्यात आला. त्यामुळे हा सामना अजॅक्सने ४-१ असा धुव्वा जिंकला.

यासह ‘राउंड ऑफ १६’च्या फेरीतच रियल माद्रिदचा बाहेर फेकला गेला. या फेरीच्या पहिल्या सामन्यात माद्रिदने अजॅक्सवर २-१ असा विजय मिळवला होता. पण दुसऱ्या फेरीतील ४-२ या पराभवामुळे एकूण ५-३ अशा पराभवासह रियाल माद्रिद स्पर्धेबाहेर झाला.