अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत स्टार टेनिसपटू रॉजर फेडरर याला उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा धक्का बसला आहे. बिगरमानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह याने तृतीय मानांकित फेडररला ६-३, ४-६, ६-३, ४-६, २-६ असे पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ७८ व्या स्थानी असलेल्या बल्गेरियाच्या दिमित्रोव्हने या आधी फेडररशी झालेले ७ सामने गमावले होते. त्यामुळे या सामन्यातही फेडरर त्याला मात देईल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. अपेक्षेप्रमाणे सामना सुरू झाला अन पहिला सेट फेडररने ३-६ असा सहज सुरू झाला. त्यानंतर दुसरा सेट दिमित्रोव्हने ६-४ असा जिंकला. तिसरा सेट पुन्हा फेडररने ३-६ ने जिंकला. पण त्यानंतर दोनही सेट जिंकत दिमित्रोव्हने फेडररला पराभवाचा धक्का दिला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 4, 2019 10:13 am