15 October 2019

News Flash

Video : नागपूरच्या ‘होम पीच’वर मुख्यमंत्री फडणवीसांनी केली बॅटिंग

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मारलेला रिव्हर्स स्विपचा फटका भाव खाऊन गेला....

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरुवारपासून कसोटीचा रणसंग्राम सुरु होणार आहे. या मालिकेसाठी दोनही संघ कसून तयारी करत आहेत. दोनही संघांकडे तगडे खेळाडू आहेत. त्यामुळे ही मालिका रंगतदार होणार यात शंकाच नाही. पण याचदरम्यान महाराष्ट्राच्या जनतेला एक नवीन तडाखेबाज फलंदाज पाहायला मिळाला.

राजकारणाच्या खेळपट्टीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा फटकेबाजी केल्याचे जनतेने पहिले आहे. विरोधकांवर टीका करताना तर त्यांची चौफेर फटकेबाजी सुरु असते. पण याच मुख्यमंत्र्यांना खऱ्याखुऱ्या खेळपट्टीवर बॅटिंग करताना पाहायला मिळाले.

नागपूरात मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण-पश्चिम मतदार संघात ‘CM चषक’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी क्रिकेटची खेळपट्टी आणि बॅट पाहिल्यावर त्यांना फलंदाजी करण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर त्यांनी नागपुरात आपल्या ‘होमपीच’वर फलंदाजीचा आनंद घेतला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या दिशेला फटके मारत क्रिकेटमध्येपण ‘हम भी किसी से कम नही’ असे दाखवून दिले.

First Published on December 4, 2018 4:05 pm

Web Title: video cm devendra fadnavis bats on nagpur cm chashak competition