07 August 2020

News Flash

विजेंद्रसिंगला सायप्रस आणि क्यूबा येथील स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळले

ऑलिंपिक पदक विजेता भारताचा मुष्टियोद्धा विजेंद्र सिंग याच्यावर असलेल्या अमलीपदार्थ सेवन प्रकरणी त्याला सायप्रस आणि क्‍यूबा येथे होणा-या दोन अंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले

| April 6, 2013 05:17 am

ऑलिंपिक पदक विजेता भारताचा मुष्टियोद्धा विजेंद्र सिंग याच्यावर असलेल्या अमलीपदार्थ सेवन प्रकरणी त्याला सायप्रस आणि क्‍यूबा येथे होणा-या दोन अंतराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. पतियाळा येथे झालेल्या पात्रता शिबिरात विजेंद्र सहभागी झाला नसल्यामुळे त्याला सायप्रस आणि क्यूबा येथे होणा-या अंतराष्ट्रीय चॅम्पियन स्पर्धेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. संघात निवड होण्यापूर्वी पात्रता शिबिरात सहभागी होणे आवश्यक असते विजेंद्र सहभागी झाला नसल्याने त्याचा संघात समावेश करता येणार नाही असे भारतीय मुष्ट्रयुद्ध संघटनेने(आयएबीएफ) स्पष्ट केले आहे. विजेंद्र अमलीपदार्थ सेवन प्रकरणातून निर्दोश बाहेर येईल अशी आयएबीएफ ने आशा व्यक्त केली आहे.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2013 5:17 am

Web Title: vijender singh dropped from indian team for events in cyprus cuba
Next Stories
1 हैदराबादचा सूर्योदय!
2 हमसे ना टकराना!
3 राहीचा ‘सुवर्ण’भेद!
Just Now!
X