28 February 2021

News Flash

ICCच्या Team of the Year वर किंग कोहलीचा दबदबा

कसोटी आणि वन-डे संघाचं नेतृत्व भारतीय कर्णधाराकडे

कर्णधार विराट कोहली

भारताचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाला थेट ICC ने मान्यता दिली आहे. २०१८ च्या ICC कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा ICC कडून करण्यात आली. या दोनही संघांचे नेतृत्व विराट कोहलीकडे देण्यात आले आहे. ICC Men’s ODI Team of the Year 2018 संघात रोहित शर्मा, विराट कोहली, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह या चौघांना स्थान देण्यात आले आहे.

तर ICC Test Team of the Year 2018 संघात विराट कोहली, ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह या तिघांना स्थान देण्यात आले आहे.

याशिवाय , ऋषभ पंत याला यंदाचा उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरविण्यात आले आहे.

तर २०१८ साली झालेल्या १९ वर्षाखालील विश्वचषकात भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले, तो क्षण चाहत्यांना सर्वाधिक पसंतीस पडलेला क्षण ठरला आहे.

दरम्यान, पंच कुमार धर्मसेना यांना या वर्षाचा सर्वोकृष्ट पंच पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याला खिलाडीवृत्ती दाखवल्याबद्दल ICC Spirit of Cricket Award 2018 पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियाचा फिंच याने केलेली ७६ चेंडूत १७२ धावांची खेळी ICC Men’s T20I Performance of the Year 2018 ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 11:26 am

Web Title: virat kohli is the captain of icc mens odi team of the year 2018 and icc test team of the year 2018 rishabh pant icc mens emerging cricketer of the year 2018
Next Stories
1 FIH Series Finals : भारतीय हॉकी संघासमोर तुलनेने सोपं आव्हान
2 2019 चा विश्वचषक जिंकण्याची पाकिस्तानी संघात क्षमता – शोएब मलिक
3 पृथ्वी शॉचे पुनरागमनाचे संकेत, म्हणाला आयपीएलआधी फिट होईन !
Just Now!
X