ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने ४ धावांनी अतिशय रोमांचक विजय मिळवला. मार्टिन गप्टील (९७), केन विल्यनसन (५३) आणि जिमी निशम (४५*) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला २२० धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना, मार्कस स्टॉयनीस (७८), जोश फिलीप (४५) आणि डॅनियल सॅम्स (४१) यांच्या खेळीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला केवळ २१५ धावांपर्यंतच मजल मारता आली. या रोमांचक सामन्यानंतर भारतीय चाहत्यांमध्ये सर्वाधिक चर्चा रंगली ती कायल जेमिसन आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांची… त्यांच्या कामगिरीकडे पाहून सोशल मीडियावर RCBला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले.

Ind vs Eng: इंग्लंडच्या बेन स्टोक्सला ‘त्या’ कृतीनंतर अंपायरने दिली ‘वॉर्निंग’

IPL 2021 साठी नुकताच खेळाडूंचा लिलाव पार पडला. त्यात कायल जेमिसन याला १५ कोटींच्या बोलीवर बंगळुरूने विकत घेतले. तर ग्लेन मॅक्सवेलला १४ कोटी २५ लाखांच्या बोलीवर बंगळुरूच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आले. पण दुसऱ्या ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड दुसऱ्या टी-२० सामन्यात या दोघांची कामगिरी अगदीच सुमार होती. कायल जेमिसनने ४ षटकात तब्बल ५६ धावा दिल्या आणि त्याला एकही गडी बाद करता आला नाही. तर फलंदाजीत ग्लेन मॅक्सवेलने ५ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. त्यावरून बंगळुरूला नेटीझन्सने ट्रोल केलं आणि भन्नाट मीम्सही व्हायरल झाले.

दरम्यान, RCBने कायम राखलेल्या खेळाडूंपैकी जोश फिलीपने ४५ धावांची खेळी केली. पण बंगळुरूकडूनच खेळणारे केन रिचर्डसन आणि अॅडम झॅम्पा यांनी आपल्या ४ षटकांत प्रत्येकी ४३ धावा दिल्या.