विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने नवीन वर्षात आपल्या पहिल्या परदेश दौऱ्याची सुरुवात मोठ्या धडाकेबाज पद्धतीने केली. टी-२० मालिकेत भारताने यजमान न्यूझीलंडचा ५-० ने फडशा पाडला. मात्र वन-डे मालिकेत भारताला अशाच प्रकारे मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. ३-० ने वन-डे मालिका जिंकत न्यूझीलंडने टी-२० मालिकेतल्या पराभवाचा वचपा काढला.

तिसऱ्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, न्यूझीलंडच्या खेळाचं कौतुक करताना आम्ही ही मालिका जिंकण्यासाठी लायकच नव्हतो असं म्हटलं. या मालिकेत भारतीय क्षेत्ररक्षकांनी अतिशय गचाळ कामगिरी केली, विराट कोहलीच्या मते भारतीय खेळाडूंची ही कामगिरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या दर्जाची नव्हती.

अवश्य वाचा – एकही विकेट न मिळालेल्या बुमराहला झहीरचा मोलाचा सल्ला, म्हणाला…

मात्र ब्रिटीश क्रीडा पत्रकार फ्रेडी वाईल्डने आकडेवारी देत विराटच्या या दाव्याची पोलखोल केली आहे. यासंदर्भात फ्रेडीने काय म्हणलंय पाहूयात…

न्यूझीलंडविरुद्ध वन-डे मालिकेत भारताला ३-० ने पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर भारतीय संघ दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ मार्च महिन्यात घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.