विराट कोहली हा अतिशय आक्रमक खेळाडू आहे. मैदानावर त्याची आक्रमकता साऱ्यांनीच पाहिली आहे. पण कर्णधारपदाचा भार त्याच्यावर आल्यापासून आपल्या भावनांना आवर घालणं त्याला अनेकदा शक्य झालं आहे. सुरूवातीच्या काळात आक्षेपार्ह हावभाव केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती, पण आता मात्र तो मैदानावर जबाबदारीने वागत असल्याचे सारेच पाहतात. अशातच विराट मैदानावर गोलंदाजांना चारचौघात सांगू शकणार नाही अशा शिव्या देतो, असं मत बांगलादेशचा गोलंदाज अल अमिन हुसेन याने व्यक्त केले आहे. बांगलादेशी क्रीडा वाहिनी क्रिकफ्रेन्झीशी फेसबुक लाइव्ह दरम्यान बोलताना त्याने विराटवर आरोप केले.

T20 World Cup : धोनी, धवन संघाबाहेर

“विराट कोहलीला गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूवर धाव मिळवता आली नाही की तो गोलंदाजांना शिव्या देतो. विराट गोलंदाजाबद्दल असे काही शब्द वापरतो जे शब्द आपण चारचौघात बोलूही शकणार नाही. तो शिव्या देऊन गोलंदाजाला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करतो आणि गोलंदाजावर दडपण टाकण्याचा प्रयत्न करतो. मी ख्रिस गेल, रोहित शर्मा, शिखर धवन आणि इतर अनेक महान फलंदाजांपुढे गोलंदाजी केली आहे. त्यापैकी कोणीही असभ्य भाषेचा वापर करत नाही. गोलंदाजाने चांगला चेंडू टाकला, तर ते त्या चेंडूचा सन्मान करतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर गोलंदाजाला शिव्या देत नाहीत. पण कोहली तसा नाहीये. तो कायम गोलंदाजाला डिवचण्याचा प्रयत्न करतो”, असं हुसेनने सांगितलं.

डायलॉगवरून चित्रपट ओळखा… वॉर्नरचं चाहत्यांना ‘चॅलेंज’

अल अमिन हुसेन

बांगलादेशचा दुसरा वेगवान गोलंदाज रूबेल हुसेन यानेही गेल्याच आठवड्यात कोहलीच्या मैदानावरील आक्षेपार्ह वर्तणुकीबाबत सांगितले होते. “गोलंदाजाने डॉट बॉल (निर्धाव चेंडू) टाकला की कोहली त्याला डिवचतो. हल्ली त्याचं स्लेजिंग करणं काहीसं कमी झालंय, पण १९ वर्षाखालील संघात असताना तो खूपच शिविगाळ करायचा”, असं रूबेल हुसेनने सांगितलं होतं.