News Flash

विराट कोहलीला मादाम तुसाँ संग्रहालयात स्थान

राजधानी दिल्लीत आज हा सोहळा रंगेल.

विराट कोहलीला मादाम तुसाँ संग्रहालयात स्थान
मेस्सी. कपिल देव यांच्यानंतर विराटला तुसाँ संग्रहालयात स्थान

क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. मादाम तुसाँ संग्रहालयात विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचं आज अनावरण केलं जाणार आहे. राजधानी दिल्लीत आज हा सोहळा रंगेल. याचसोबत विराट कोहलीला लिओनेल मेस्सी, कपिल देव आणि उसेन बोल्ट यांसारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळणार आहे.

“मादाम तुसाँ सारख्या संग्रहालयात माझा मेणाचा पुतळा उभारला जाणं ही माझ्यासाठी मानाची गोष्ट आहे. यासाठी मी मादात तुसाँचा आयुष्यभर ऋणी राहीन. हा अनुभव माझ्यासाठी आयुष्यभर स्मरणात राहिलं, यावर माझे चाहते काय प्रतिक्रीया देतात हे मला पहायचं आहे.” विराट कोहलीने आपलं मत व्यक्त केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2018 3:09 pm

Web Title: virat kohlis wax statue unveiled at madame tussauds
टॅग : Virat Kohli
Next Stories
1 Intercontinental Cup – भारताचं आमच्यासमोर तगडं आव्हान, छेत्रीच्या खेळानंतर न्यूझीलंडची सावध भूमिका
2 फोर्ब्स यादी: जगभरातल्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराटचा समावेश
3 कपिल देव होणार भाजपाचे खासदार? गांगुलीच्याही पक्षप्रवेशाची चर्चा
Just Now!
X