29 September 2020

News Flash

पश्चात्तापानंतर डेव्हिड वॉर्नरचा माफीनामा

इंग्लंडचा खेळाडू जो रूट याला बारमध्ये केलेल्या मारहाणीचा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पश्चात्ताप झाला असून त्याने शुक्रवारी जाहीरपणे जनतेची माफी मागितली. ‘भविष्यात पुन्हा अशी घोडचूक

| June 15, 2013 01:06 am

इंग्लंडचा खेळाडू जो रूट याला बारमध्ये केलेल्या मारहाणीचा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला पश्चात्ताप झाला असून त्याने शुक्रवारी जाहीरपणे जनतेची माफी मागितली. ‘भविष्यात पुन्हा अशी घोडचूक करू नकोस,’ असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कने त्याला दिला आहे.
‘‘बारमधील घटनेबाबत मीच पूर्णपणे दोषी आहे. पण त्या घटनेचा आता पश्चाताप होत आहे. मी माझे सहकारी, संघातील पदाधिकारी, माझी आणि माझ्या कुटुंबियांची मान शरमेने खाली घातली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केलेली कारवाई मला मान्य असून मी आता अ‍ॅशेस मालिकेकडे लक्ष केंद्रित करणार आहे,’’ असे वॉर्नरने पत्रकार परिषदेत सांगितले. वॉर्नरच्या कृत्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची चॅम्पियन्स करंडकातून हकालपट्टी केली आहे, याचप्रमाणे अ‍ॅशेस मालिकेच्या सराव सामन्यापर्यंत निलंबनाची कारवाई केली आहे.
क्लार्क वॉर्नरला म्हणाला, ‘‘हा आयपीएल किंवा कौंटी क्रिकेटमधील संघ नाही. ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करताना बेशिस्तपणा करून चालत नाही. त्यामुळे भविष्यात अशा घटना वारंवार घडू नयेत, याची काळजी घे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:06 am

Web Title: warners action despicable apology counts for little ca
टॅग David Warner
Next Stories
1 ताल बुद्धिबळ स्पर्धा :कारुआनाने आनंदला पहिल्याच फेरीत हरवले
2 जागतिक हॉकी लीग : नेदरलँड्सविरुद्ध भारताची आज खडतर परीक्षा
3 आज ब्राझीलची गाठ जपानशी
Just Now!
X