News Flash

VIDEO: धोनीचा प्रभू देवासोबतचा ‘लुंगी डान्स’ इंटरनेटवर व्हायरल

धोनीने एका जाहिरातीत केलेला डान्स तुम्हाला आठवतोय का?

VIDEO: धोनीचा प्रभू देवासोबतचा ‘लुंगी डान्स’ इंटरनेटवर व्हायरल

महेंद्रसिंग धोनीचे क्रिकेटमधील पराक्रम आपण आजवर पाहिले आहेत. आपल्या अफलातून फलंदाजीने धोनीने क्रिकेटरसिकांना टेलिव्हिजनसमोर खिळवून ठेवलं पण धोनी एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. धोनीच्या नृत्य शैलीची प्रचिती आपल्याला त्याने केलेल्या जाहिरातींतून मिळाली. लोकप्रिय नृत्य दिग्दर्शक प्रभू देवासोबत धोनीने एका जाहिरातीत केलेला डान्स तुम्हाला आठवतोय का? नाही तर ही जाहिरात नक्की पाहा. यात धोनीचा ‘लुंगी डान्स’ पाहायला मिळाला होता. खुद्द प्रभू देवाने धोनीला थिरकवण्यास भाग पाडलं होतं.

टीव्हीएस या मोटारसाकयल कंपनीच्या एका जाहिरातीत धोनीने काम केलं होतं. खरंतर ही जाहिरात तशी जुनीच आहे. पण आज ती सोशल मीडियावर अचानक व्हायरल झाली आहे. जाहिरातीचं चित्रीकरणावेळीचा या व्हिडिओमध्ये प्रभू देवा धोनीला लुंगीवर नृत्य करण्याचे धडे देताना दिसतो. धोनीला सुरूवातीला ते कठीण जात असल्याचं लक्षात येत असताना दोघांमध्ये धमाल उडल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. टीव्हीएस कंपनीच्या एका मोटारसायकलसाठी चित्रीत करण्यात आलेली ही जाहिरात गेल्या वर्षीची आहे. धोनी या कंपनीचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर राहिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2017 7:17 pm

Web Title: watch ms dhoni mastering lungi dance from prabhu deva
Next Stories
1 VIDEO : निवृत्तीनंतर मिसबाहचे भावूक भाषण
2 IPL: पुण्याच्या संघातील ‘वॉशिंग्टन’च्या नावात दडलेली ‘सुंदर’ कहाणी
3 VIDEO : ‘चॅम्पियन’नंतर डीजे ब्रावो नवीन गाण्याच्या तयारीत व्यग्र
Just Now!
X