क्रिकेटमध्येही ‘रेड कार्ड’ दाखविले जाण्याचा पर्याय आजमावण्याच्या विचारात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ(आयसीसी) असतानाच पाकिस्तान सुपर लीगमध्ये(पीएसएल) दोन पाकिस्तानी क्रिकेटपटू आपापसात भिडले. क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जालमी यांच्यातील सामन्यात पाकिस्तानचा सध्याचा आघाडीचा फलंदाज अहमद शहजाद आणि गोलंदाज वहाब रियाझ हे पाक क्रिकेटपटू आपापसात भिडले. दोघांमधला वाद हा थेट हाणामारीपर्यंत पोहोचला होता.
सामन्याच्या पाचव्या षटकात क्वेटा ग्लॅडिएटर्सकडून खेळणाऱया अहमद शहजादने वहाब रियाझला दमदार षटकार खेचला. मग त्यानंतरच्या दुसऱयाच चेंडूवर वहाबने शहजादचा त्रिफळा उडवून त्याला चालते केले. यादरम्यान दोघांमध्ये बाचाबाजी झाली आणि दोघेही एकमेकांवर धावून गेले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 15, 2016 4:32 pm