26 September 2020

News Flash

शिवा थापाला सचिनकडून शुभेच्छा

शिवाने ट्विटरद्वारा सचिनशी संपर्क साधला. तेव्हा सचिनने उत्तर देत लिहिले

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर

रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झालेल्या शिवा थापा या एकमेव भारतीय बॉक्सरला ख्यातनाम क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवाने ट्विटरद्वारा सचिनशी संपर्क साधला. तेव्हा सचिनने उत्तर देत लिहिले, रिओ ऑलिम्पिकसाठी माझ्यातर्फे तुला हार्दिक शुभेच्छा. आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठिशी आहोत. कोणतेही दडपण न घेता जिद्दीने या स्पर्धेत भाग घे. सकारात्मक वृत्तीने खेळलास तर निकाल आपोआप तुझ्या बाजूने लागेल. खेळाचा निखळ आनंद घेत या स्पर्धेतील लढतींना सामोरे जायला पाहिजे. निर्भयी वृत्तीने खेळलास तर तुला या लढतींमध्ये विजय मिळविताना कोणतीही अडचण येणार नाही. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेताना तुला कधी दडपणास सामोरे जावे लागले होते काय व अशा दडपणाखाली तू कसा खेळलास असे शिवा याने सचिनला विचारले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2016 3:53 am

Web Title: we are with you sachin tendulkar tells rio bound shiva thapa
टॅग Sachin Tendulkar
Next Stories
1 भारत पेट्रोलियम, एअर इंडिया उपांत्य फेरीत
2 मलिंगाशिवायही चांगली कामगिरी करू
3 युवराज सिंग आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
Just Now!
X