07 March 2021

News Flash

रुग्णालयातून डिस्जार्च मिळाल्यानंतर गांगुली म्हणाला…

गांगुलीला रुग्णालयातून घरी सोडलं असले तरीही डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जाणार आहे.

माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलाला आज, गुरुवारी रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी गांगुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या डोळ्यापुढे अंधारी आली आणि त्याला रूग्णालयात घेऊन जाण्यात आले. दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या खाजगी रूग्णालयात त्याच्यावर उपचार झाले. गुरुवारी सकाळी सौरव गांगुलीला रुग्णालयातून डिस्जार्ज देण्यात आला आहे. गांगुलीला रुग्णालयातून घरी सोडलं असले तरीही डॉक्टरांकडून त्याच्या प्रकृतीची दररोज माहिती घेतली जाणार आहे.

डिस्जार्ज मिळाल्यानंतर गांगुलीनं रुग्णालयातील डॉक्टरांचे आभारही व्यक्त केले आहेत. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार डिस्जार्ज मिळाल्यानंतर गांगुली म्हणाला की, ” माझ्यावर वेळीच योग्य ते उपचार करणाऱ्या रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे धन्यवाद. माझी प्रकृती सध्या उत्तम आहे.”

प्रकृती ठणठणीत असतानाही गांगुलीनं एक दिवस रुग्णालयातच राहण्याचा निर्णय घेतला होता. वूडलँड रुग्णालयातील डॉक्टरांनी बुधवारीच गांगुलीला घरी जाण्याची परवानगी दिली होती. मात्र, गांगुलीनं आणखी एक दिवस रुग्णालयातच राहण्याचा निर्णय घेतला होता. गांगुलीच्या प्रकृतीमध्ये झपाट्यानं सुधारणा होत असल्याने त्यांच्यावर होणारी अ‍ॅन्जिओप्लास्टी पुढे ढकलण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2021 11:18 am

Web Title: west bengal bcci president sourav ganguly discharged from woodlands hospital in kolkata nck 90
Next Stories
1 “पाकिस्तानचा संघ इतकं वाईट खेळत राहिला तर…”
2 याला म्हणतात दरारा… भारतीय गोलंदाजांमुळे ३५ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला घ्यावा लागला ‘तो’ निर्णय
3 ‘रोहित-वॉर्नर यांची कामगिरी मालिकेचे भवितव्य ठरवेल’
Just Now!
X