News Flash

कोर्नेटकडून आंद्रेस्क्यूला पराभवाचा धक्का

बोगडॅनच्या चुकांचा फायदा घेत एका तासात पावल्युचेन्कोव्हाने सामना खिशात घातला.

कोर्नेटकडून आंद्रेस्क्यूला पराभवाचा धक्का

अलिझे कोर्नेटने दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा बियांका आंद्रेस्क्यूला पराभवाचा धक्का दिला आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत फ्रान्सच्या कोर्नेटने कॅनडाच्या पाचव्या मानांकित आंद्रेस्क्यूला ६-२, ६-१ असे सरळ सेटमध्ये नामोहरम केले.

या सामन्यात कोर्नेटनेमाजी अमेरिकन विजेत्या आंद्रेस्क्यूची सर्व्हिस पाच वेळा भेदत वर्चस्व गाजवले. दोन आठवड्यांपूर्वी कोर्नेटने बर्लिंन खुल्या टेनिस स्पर्धेत आंद्रेस्क्यूला पराभूत केले होते.

फ्रेंच ग्रँडस्लॅम स्पर्धेतील उपविजेत्या रशियाच्या अनास्तासिया पावल्युचेन्कोव्हाने रोमानियाच्या अ‍ॅन बोगडॅनचा ६-२, ६-२ अशा फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. बोगडॅनच्या चुकांचा फायदा घेत एका तासात पावल्युचेन्कोव्हाने सामना खिशात घातला. फें्रच स्पर्धेत तिने प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. परंतु बार्बोरा क्रेजिकोव्हाने तीन सेटमध्ये रंगलेल्या सामन्यात तिचा पराभव केला.  तसेच तिसऱ्या मानांकित एलिना स्विटोलिनाने एलिसन व्हान युटव्हॅन्कचा ६-३, २-६, ६-३ असा पराभव केला.

जोकोव्हिच तिसऱ्या फेरीत

सर्बियाच्या गतविजेत्या नोव्हाक जोकोव्हिचने दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला ६-३, ६-३,

६-३ असे नमवून पुरुष एकेरीची तिसरी फेरी गाठली आहे. याचप्रमाणे जपानच्या केई निशिकोरीने १००व्या ग्रँडस्लॅम विजयाची नोंद करताना अ‍ॅलेक्सी पॉपीरिनचा ६-४, ६-४,

६-४ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2021 1:24 am

Web Title: wimbledon tennis competitions france in the first round akp 94
Next Stories
1 धोनीला खेळायचा होता टी-२० वर्ल्डकप..! माजी निवडकर्त्यांनी केला खुलासा
2 भारताचा जलतरणपटू श्रीहरी नटराजनला मिळालं ऑलिम्पिकचं तिकीट
3 इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का!
Just Now!
X